नागपूर : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदी ना त्यांच्या ठिकाणी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात आणि परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने काही अटींवर परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nagpur.gov.in या संकेतस्थळ यावर ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवशयक आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे नावे सादर करणे आवश्यक आहे,
अर्ज करताना स्वतःचे वाहन अथवा शासकीय सुविधा, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, दूरध्वनी, कोठे जायचे आहे, किती व्यक्ती सोबत आहेत, त्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील व्यक्तींना राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यातील जिल्ह्यामध्ये जावयाचे असल्या सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात कोरोनामुळे वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील राहिवाशांनी त्याचे निवासस्थानी परत येण्यासाठी ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Also Read- Filling information for travelling to and from Nagpur District