२ दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडणारा तरुण झाला 3000 कोटींच्या कंपनीचा मालक!

Date:

रितेश अग्रवाल – ओयो या हॉटेल चेन सर्व्हिसचा हा संस्थापक. ओयोनं आता चीनमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. अल्पावधीत यशस्वी ठरलेल्या ओयो रूम्सची कल्पना कशी सुचली याची आणि रितेशच्या ध्यासाची ही गोष्ट.

ओयो रूम्स या कंपनीचं मूल्य ४० कोटी डॉलर एवढं म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढं झालंय. चीनमध्ये ओयो रूम्स लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधली बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत.

ओडिशाच्या बिस्सम कटक गावात रितेश अग्रवालचा जन्म झाला. लहानपणापासूनच रितेशला फिरण्याची आवड होती. लहान वयातच स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासारख्यांच्या कहाण्यांनी तो प्रभावित झाला होता. त्यांच्यासारखं आपणही काहीतरी नवीन, वेगळं सुरू करावं या विचारानं तो प्रेरित झाला होता.

सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचं आयआयटीमध्ये अॅडमिशन घेण्याचं ध्येय असतं. इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळावी म्हणून रितेशने कोचिंग क्लासही जॉईन केला होता. पण त्यात अपयश आलं. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ लंडनशी संलग्न असलेल्या दिल्लीतल्या कँपसमध्ये रितेशनं अॅडमिशन घेतली. पण दोन दिवसातच कॉलेज सोडून दिलं. त्याच्या या निर्णयानं पालक खूप नाराज झाले. पण रितेशची बिझनेस आयडिया ऐकल्यावर आणि त्यासाठी त्याचं ध्येयानं पछाडलेलं काम पाहिल्यावर त्याला पालकांचाही पाठिंबा मिळाला.

आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा, उद्योगपती व्हायचं या ध्येयानं रितेश इतका पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. सुरुवातीचे काही दिवस रितेश मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता. आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा, उद्योगपती व्हायचं या ध्येयानं रितेश इतका पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. सुरुवातीचे काही दिवस रितेश मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता.

भारताबरोबरच आता चीनमध्ये ओयो रूम्सनं हातपाय पसरले आहेत. लवकरच आग्नेय आशियात आपला विस्तार करण्याचं उद्दिष्ट साकार करण्याच्या उद्देशाने रितेशची ही कंपनी मोठे गुंतवणूकदार शोधत आहे. तेही उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

ओरावेल डॉट कॉम नावाची कंपनी सुरू केली, तेव्हा रितेश फक्त १७ वर्षांचा होता. देशभरातल्या पर्यटकांना किफायतशीर किमतीत बेड- ब्रेकफास्टच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने ही कंपनी सुरू झाली. ३००० कोटी रुपयांची कंपनी – ओयोने आधीच्या गुंतवणूकदारांसह हीरो एंटरप्रायझेसकडून २५ कोटी डॉलर्सचं फंडिंग मिळवलं. यातून भारत आणि आग्नेय आशियात विस्तार करण्याचं लक्ष्य आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...