नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या आग प्रतिबंधक उपाययोजना व जिवसंरक्षक मार्गदशन नुसार शहरातील उंच इमारती , शाळा , कॉलेज , हॉस्पीटल , मॉल, हॉटेल , फायर मॉक ड्रिल व इव्हॅकेशन ड्रिल घेण्याबाबत कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने नागपूर शहरातील अॅलेक्सीस हॉस्पीटल , मानकापूर कोराडी रोड याची निवड करून मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र आर. उचके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. केशव आर. कोठे , कार्य.सहा.स्थानाधिकारी, यांनी दि. 16.07.2018 ला उपरोक्त हॉस्पीटल मध्ये ड्रिल बाबत प्रशिक्षण देवून ड्रिल करीता इव्हॅकेशन टिम जसे – संचार टीम, फायर टीम, बचाव टीम, शोध चमू तसेच प्राथमिक उपचार टीम , ट्रान्सपोर्ट टीम , मीडीया टीम व मॅनेजमेन्ट टीम तयार करून हॉस्पीटल टिम तयार करण्यात आल्या व दि. 19.07.2018 दुपारी 12ः00 वाजता हॉस्पीटल संचालक, जतिन्द्र अरोरा, प्रशासकिय अधिकारी श्री. अब्बास हप्पावाला, श्री. राजेश पोखले, असिसंन्ट फॅसिलीटी मॅनेजर व हॉस्पीटलचे फायर अॅन्ड सेफ्टी ऑफीसर श्री. पांडे यांच्या उपस्थीतीमध्ये सिव्हील अग्निशमन स्थानक अंतर्गत ड्रिल घेण्यात आली.
यावेळी हॉस्पीटल मधील 450 कर्मचारी त्यामध्ये 60 डॉक्टर, 92 नर्स, व 72 पेशन्ट, 150 नातेवाईक होते. हॉस्पीटलच्या छतावर वेल्डींगचे काम करीत असतांना आग लागल्याची सूचना मिळाली यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे केशव आर. कोठे, श्री. सुनिल एस. राऊत, कार्य.सहा.स्थानाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, श्री. अनिल बालपांडे मॅक्यानिक, श्री. सिताराम डहाळकर, श्री. बाबाराव खंडागळे, श्री. शालीक कोठे, श्री. तुषार नेवारे, श्री. शिवणकर फायरमन यांनी टी.टी.एल. द्वारे 6 व्या मजल्यावर अडकलेल्या कर्मचा-यांना खाली आणण्यात आले. यादरम्यान हॉस्पीटल मधील 7 पेन्शटला वेगवेगळया अॅम्ब्युलन्सने दुस-या हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आले. अशा प्रकारे फायर अॅन्ड इव्हॅकेशन ड्रिल सपन्न करण्यात आली.
अधिक वाचा : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक हजार घरे बांधणार : २०१ कोटीच्या कामांसाठी संचालक मंडळाची मंजुरी