नव्या फिचरमुळे व्हॉटसअॅप चा अॅडमिन सर्वशक्तिमान झाला, वाचा सविस्तर.

Date:

संभाषणाचं सर्वात सोपं साधन बनलेल्या व्हॉटसअॅप ने नवनवीन फिचर्स आणायला सुरूवात केली आहे. व्हॉटसअॅप ने आणखी एक नवं फिचर सुरू केलं असून यामुळे अॅडमिनला सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत.

ग्रुपमध्ये कोणी पोस्ट टाकायच्या याचा निर्णय आता अॅडमिन घेऊ शकतो. ग्रुपमध्ये अनेकांना समाविष्ट केलं असलं तरी काही सदस्य बाष्कळ पोस्ट टाकत असतात. अनेकदा काही मंडळी विखारी आणि तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट वारंवार टाकत असतात. अशा पोस्टमुळे अॅडमिन धोक्यात येऊ शकतो त्यामुळेच व्हॉटस अॅपने हे नवं फिचर सुरू केलं आहे.

या फिचरमुळे अॅडमिनला दोन पर्याय मिळतात पहिला असतो तो म्हणजे ग्रुप मधील कोणत्याही सदस्याने पोस्ट टाकण्याची मुभा असलेला पर्याय आणि दुसरा म्हणजे फक्त अॅडमिननेच पोस्ट टाकण्याचा पर्याय.

जर अॅडमिनने नवं फिचर वापरून इतर सदस्यांना पोस्ट करण्यास बंदी घातली असेल आणि एखाद्याने पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याबाबतचा मेसेज अॅडमिनला मिळतो. ती पोस्ट स्वीकारून पोस्ट करण्याला परवानगी द्यायची की नाही हे अॅडमिन ठरवतो, त्याचा होकार आला तरच ती पोस्ट ग्रुपमध्ये पडते. या फिचरचा वापर अफवा पसरवणारे संदेश, समाजात वितुष्ट निर्माण करणारे संदेश, विचलीत करणारी दृश्य फोटो रोखण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे फिचर कसं वापरायचं?

१. तुम्हाला ज्या ग्रुपसाठी निर्णय घ्यायचा आहे, तो ग्रुप निवडा.

२. ग्रुपचं जिथे नाव असतं त्याच्या बाजूला तीन टिंब असतात त्यावर क्लिक करा.

३. यातील सगळ्यात पहिला म्हणजे ‘Group info’ हा पर्याय निवडा.

४. हा पर्याय निवडताच तुम्हाला पाच पर्याय आलेले दिसतील.

५. यातील तुम्हाला ‘Group Setting’ हा पर्याय निवडायचा आहे.

६. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला पर्याय दिसेल तो असेल ‘Edit group info’.

७. यामध्ये आता तुम्हाला All participant किंवा Only admin यापैकी हवा तो पर्याय निवडायचा आहे.

अधिक वाचा : इन्स्टाग्राम ने आणले नवीन विडिओ चॅट आणि कॅमेरा इफेक्ट्स फिचर

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related