WhatsApp मेसेजिंग ॲप 2021च्या पहिल्या दिवसापासून काम करणार नाही…..

Date:

मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरात असणाऱ्या ” WhatsApp” या मेसेजिंग ॲपमध्ये अनेक बदल झाले, अपडेटही आले. या ॲपचा वापर इतका सर्रास झाला, की अनेकांसाठी महतत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाणघेवाणीसाठी WhatsApp लाच प्राधान्य देण्यात आलं.

पण, आता मात्र ही परिस्थिती काहीशी बदलणार आहे. कारण, 2021च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2021 काही ॲन्ड्रॉईड कार्यप्रणाली आणि आयफोन डिवाईसवर हे ॲप WhatsApp काम करणार नाहीये.

iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम नसणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही. यासंदर्भातील यादीही जाहीर करण्यात आली आहे. ऑपरेटींग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचा वापर करण्याचा सल्लाही व्हॉट्सॲपकडून युजर्सना देण्यात आला आहे. असं केल्या नंतरच त्यांना मेसेजिंग ॲपमधील काही नवे फिचर्स वापरता येणार आहेत.

परिणामी पुढील दिवसांमध्येही व्हॉट्सॲपचा वापर सुरु करण्यासाठी तुम्हीही फोनच्या ऑपरेटींग सिस्टीमबाबतची माहिती लगेचच करुन घ्या. असं न केल्यास नव्या वर्षातच तुम्हाला व्हॉट्सॲपपासून दूर राहावं लागणार आहे. फोन अपडेट करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन सिस्टीम अपडेटच्या पर्यायाची निवड केल्यास ऑपरेटींग सिस्टीमचं नवं व्हर्जन अपडेट होऊन तुम्ही बहुविध ॲपची सेवा अविरतपणे अनुभवू शकता.

दरम्यान, व्हॉट्सॲपच्या या नव्या व्हर्जनसाठी अ‍ॅपल कंपनीच्या (iPhone 4), (iPhone 4S), (iPhone 5), (iPhone 5S), (iPhone 6) आणि (iPhone 6S) ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 च्या व्हर्जननं अपडेट करावं लागणार आहे. तर, (iPhone 6S), (6 Plus), (iPhone SE) हे फर्स्ट जनरेशनचे आयफोन असल्यामुळं ते iOS 14 वरून अपडेट करता येऊ शकतात.

एँड्रॉईड फोनच्या बाबतीत सांगावं तर, 4.0.3 सिस्टीम नसणाऱ्या (Device) वर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. अशा फोनमध्ये (HTC Desire), (LG Optimus Black), (Motorola Droid Razr), (Samsung Galaxy S2) चा समावेश आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...