रिलायन्सच्या ‘जिओ फोन’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन ‘जिओ-२’ देखील बाजारात दाखल झालं. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फेसबुक, युट्यूब, गुगल मॅप यासोबतच व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
‘जिओ-२’ च्या ग्राहकांना जिओ अॅप स्टोअरमधून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करता येणार आहे. ‘जिओ-२’ मधील ‘KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हॉट्स अॅप उपलब्ध करण्यात आलं आहे. १० सप्टेंबरपासून जिओ अॅपमध्ये व्हॉट्स अॅप उपलब्ध आहे.
भारतातील व्हॉट्स अॅप युजर्सची संख्या वाढत असून व्हॉट्स अॅप आता जिओ फोनवर संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे, असं व्हॉट्स अॅपचे उपाध्यक्ष ‘क्रिस डॅनियल्स’ यांनी सांगितलं. आपल्या जवळील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी ‘जिओ-२’ मधील व्हॉट्स अॅपची नक्कीच मदत होईल असंही डॅनियल्स यांनी म्हटलं आहे.
‘जिओ-२’ व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी:
- सर्व प्रथम मेन्यू ऑप्शन उघडा
- फोनमधील अॅप स्टोर शोधा
- अॅप स्टोअरवर क्लिक करून व्हॉट्स अॅप सर्च करा
- आयकॉनवर क्लिक करून ‘व्हॉट्स अॅप’डाऊनलोड करा
अधिक वाचा : उबर ने लॉन्च किया राइड चेक सिक्योरिटी फीचर, एक्सीडेंट होने की स्थिति में करेगा अलर्ट