Coronavirus In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संकटाच्या काळात प्रत्येकानं स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाची सामान्य लक्षणं जरी जाणवली तरीदेखील तात्काळ कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे. लक्षण जाणवल्यानंर RT-PCR चाचणी करण्यावर अनेक लोक भर देतात. मात्र, अनेक जणांच्या RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना खोकला, ताप, अशक्तपणा यासारखी कोविडची लक्षणं जाणवतात, अशा वेळी आपण जास्त सावधान राहिलं पाहिजे, असा सल्ला एआयआयएमएसमधील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. कोरोना विषाणू काळानुरुप आपलं रुप बदलत आहे. भारतीय स्ट्रेनचा कोरोना विषाणूमुळे लक्षणं असतानाही RT-PCR चाचणी निगेटिव्ह येतेय, असं गुलेरिया म्हणाले.
कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि एआयआयएमएसमधील प्रमुख डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, लक्षणं असतानाही RT-PCR चाचण्या निगेटिव्ह येते. लक्षणं असताना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बिंदास्त राहू नका, काळजी घ्या. अशा रग्णांनी नियमांप्रमाणे कोरोनाचे उपचार घ्यावेत. भारतामध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन धोकादायक आहे. एक मिनिट जरी तुम्ही बाधित रुग्णांच्या संपर्कात आलात तर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते.
सध्याची ‘RT-PCR’ चाचणी ही मूलत: विषाणूच्या ‘आरएनए’ची तपासणी करते. कोरोनाच्या सर्व नवीन रूपांमध्ये आरएनए हे विषाणूसारखेच आहेत, केवळ त्यांचे ‘स्पाइक प्रोटीन’ बदलले जातात. सध्याच्या सर्व चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूची नवीन रूपेदेखील शोधली जात आहेत. परंतु, खरी समस्या अशी आहे, की ‘आरटी-पीसीआर’चा संवेदनशीलता दर (परिणामकारकता दर) हा केवळ ६० ते ७० टक्के आहे. याचा अर्थ असा, की ‘RT-PCR’ चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, तरी संबंधित रूग्ण हा पॉझिटिव्ह असण्याची शक्यता ३०ते ४०टक्के इतकी असतेच.