‘कू’ हा भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. कू युजर्सना सोशल मीडिया जबाबदारीने कसा वापरावा हे शिकवते आहे. कू भारतीयांना त्यांच्या भाषेत व्यक्त होण्याती संधी देते. विशेषत: हे सगळे पहिल्यांदाच सोशल मीडिया वापरणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया योग्य पद्धतीने, सुरक्षितपणे आणि विधायक हेतूने वापरावा हे अतिशय महत्त्वाचे आहे.
सोशल मीडिया हे लोकांना जोडण्यासह त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. हे माध्यम समाजकंटकांकडून आर्थिक फसवणूक, खासगीपणावर अतिक्रमण करणे, माहिती चोरणे आणि इतरही गुन्ह्यांसाठी वापरले जाऊ शकते. भारतातून संपूर्ण जगभरासाठी तयार केलेला सोशल मीडिया ब्रॅंड म्हणून कू ॲप युजर्सना माहिती मिळवून देण्यास अनेक पावले उचलते आहे. यातून युजर्स कुठलाही मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी सावधपणे विचार करू शकतात. सोबतच विविध समुहांशी जोडून घेताना ते आपल्या फीडचेही नीट व्यवस्थापन करू शकतात.
कू ॲपने नुकताच इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीइआरटी-इन) आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एमइआयटीवाय), भारत सरकारसोबत करार केला आहे. यामाध्यमातून ऑक्टोबर महिन्यात संयुक्तपणे नागरिकांपर्यंत पोचून सायबर सुरक्षेसंदर्भात प्रबोधन केले जाते. ऑक्टोबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागृती महिना असतो. सीइआरटी-इन आणि कू ॲप या दोघांनी एकत्र येत फिशिंग, हॅकिंग, खासगी माहितीची सुरक्षा, पासवर्ड आणि पिनचे व्यवस्थापन, क्लिकबेट्स टाळणे आणि सार्वजनिक वायफाय वापरताना आपली गोपनीयता व खासगीपण जपणे अशा कळीच्या गोष्टींबाबत लोकांमध्ये जागृती केली. ‘कू’ने ही मोहिम अनेक भारतीय भाषांमध्ये पार पाडली.यातून देशभरातल्या इंटरनेट युजर्समध्ये जागृती घडली.
सोबतच, युजर्सचे प्रबोधन करण्याच्या या मोहिमेत, कू कंटेट मॉडरेशनसाठी क्राऊड-सोर्सिंगही करत आहे. यात युजर्सना खोट्या मजकूराकडे निर्देश केल्याबद्दल बक्षिस दिले जाईल. तसेच, पडताळून न पाहता मजकुराला फेक म्हणल्यास त्यांना दंडही होऊ शकतो.
कू हा भारतीय मंच युजर्सना ऑनलाईन उपलब्ध असलेल्या मोफत संसाधनांबाबत जागरूक करतो आहे. कुठलाही मजकूर ऑनलाइन शेअर करण्याआधी युजर्स ही संसाधने वापरता येतात. सोबतच कू सध्या सल्लागार मंडळ नेमण्याची प्रक्रियाही करते आहे. हे मंडळ कंटेंट मॉडरेशनची धोरणे ठरवेल. एक जबाबदार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून कू सातत्याने प्रभावी पद्धती शोधत स्थानिक पातळीवर अंमलात येऊ शकणारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. यातून युजर्सना निश्चितच विविध भाषांमध्ये सोशल होत संवाद साधण्याचा प्रभावी आनंद घेता येतो.