क्षयरोग जनजागृतीसाठी मनपातर्फे रविवारी वॉकॉथॉन

Date:

नागपूर : दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने टाटा ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने क्षयरोग जनजागृतीसाठी २४ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत वॉकॉथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

सिव्हील लाईन्स येथील पोलिस जिमखानाजवळील वॉकर स्ट्रीट येथून वॉकॉथॉनला सुरुवात होईल. लेडीज क्लब, लॉ कॉलेज चौक, भोले पेट्रोल पंप, जीपीओ चौक असे मार्गक्रमण करीत वॉकर स्ट्रीट येथे समारोप होईल. क्षयरोगाच्या जनजागृतीसोबतच ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे. सदर वॉकॉथॉनमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपसंचालक (आरोग्य) डॉ. तुमाने यांनी केले आहे.

अधिक वाचा : होळीच्या पर्वावर बेघरांना कपड्यांचे वाटप

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related