जर आपण हार्डकोर वर्कआउट करण्यास सक्षम नसाल तर प्रत्येक मील नंतर (meal) म्हणजेच नाश्ता, लंच व डिनर केल्यानंतर थोडा वेळ वॉक करून देखील तुम्ही फिट राहू शकता. संशोधनानुसार, दररोज 10 ते 30 मिनिटे चालण्यामुळे (walk) बर्याच रोगांवर मात करता येऊ शकते.
जर तुम्हाला आजीवन निरोगी फिट रहायचे असेल तर व्यायाम करणं कधीही सोडू किंवा चुकवू नका. वर्कआउट्सचे नेहमीच सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, जे केवळ आपल्याला फिटच राखत नाहीत तर स्नायूंना बळकटी देखील देतात. फिटनेस फ्रीक लोक दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवण घेतल्यानंतरही चालायला जातात पण काही लोकांना जेवण झाल्यावर लगेच झोपायची सवय असते. जर तुम्ही देखील हेच करत असाल तर समजून जा की आपण रोगांना आमंत्रण देत आहात.
शरीर फिट ठेवण्यासाठी हेल्दी आहार घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच ते संपूर्ण शरीरात पोहचवणं देखील आवश्यक असतं. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ वॉक करायला जाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देखील दिला जातो. आजच्या लेखात आपण खाल्ल्यानंतर चालण्याचे फायदे व इतर माहिती जाणून घेणार आहोत.
पचनप्रक्रिया राहते चांगली (digestive system)
जेवल्यानंतर जर आपण फेरफटका मारायला किंवा वॉक करायला गेलो तर आपली पचनप्रक्रिया चांगली राहते. हलक्या वॉकमुळे केवळ आपला आहारच पचत नाही तर जेवल्यानंतर चालल्यामुळे पौष्टिक आहार शरीराच्या प्रत्येक भागात जसंं की 1Trusted Source, 2Trusted Source, 3Trusted Source मध्ये पोहचतो. रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ वॉक केल्याने आपण आपल्याला पेप्टिक अल्सर, आतड्यांसंबंधी सिंड्रोम (IBS), डायव्हर्टिक्युलर रोग, बद्धकोष्ठता आणि कोलोरेक्टल कर्करोग यासारख्या गंभीर आजारांसोबतच राग आणि चिडचिड यासारख्या समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. याव्यतिरिक्त चालल्यामुळे चयापचय प्रक्रिया (metabolism) अधिक मजबूत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
मधुमेह होतो नियंत्रित
काही अभ्यासांनुसार, जेवणानंतर काही वेळ वॉक केल्यामुळे रक्तातील वाढलेली साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत होते. जास्त वजन हे टाईप २ मधुमेहाचे कारण बनू शकते. अशा परिस्थिती खाल्ल्यानंतर आपण थोडा वेळ फेरफटका मारायला गेलो तर या समस्येशी लढायला मदत मिळू शकते. टाइप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांवर 2016 मध्ये संशोधन करण्यात आले होते, ज्यात असे आढळले आहे की जेवणानंतर 10 मिनिटे वॉक केल्याने आहारानंतर वाढणारी रक्तातील साखर (Blood sugar management) आपोआप कमी होते. संशोधनामध्ये प्रत्येक जेवणानंतर 30-मिनिटे चालणे अधिक चांगले सिद्ध झाले आहे.
हृदयरोगाचा धोका कमी होतो
अनेक दशकांपासून शारीरिक हालचाली हृदयासाठी फायदेशीर मानल्या गेल्या आहेत. ही गोष्ट संशोधनातही सिद्ध झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभाग आणि मानव सेवा विभाग (डीएचएचएस) च्या मते, खाल्ल्यानंतर 10 मिनिटं चालणे हृदयविकाराचा धोका कमी करण्याचं काम करतं. एका अभ्यासात सिद्ध झाले की ह्रदयरोगासाठी जबाबदार असलेल्या ब्लड ट्रायग्लिसरायड्स कमी करण्यासाठी हलकासा व्यायाम देखील प्रभावी ठरू शकतो. आपण दिवसभर मुख्य जेवणाच्या नंतर 5 ते 10 मिनिटांचा फेरफटका मारून किंवा वॉक करून देखील असं करू शकता. जे आपल्याला आयुष्यभर निरोगी राहण्यास देखील मदत करेल.
वेट लॉससाठी लाभदायक
दररोज जेवल्यानंतर सुमारे 30 मिनिटे चालल्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत मिळू शकते. तज्ञांच्या मते, खाल्ल्यानंतर वॉक केल्यामुळे 150 कॅलरी जळतात आणि लठ्ठपणा कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर नियमित न चुकता वॉक करावा. यासोबतच हेल्दी डाएट किंवा आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळलं पाहिजे.
हाडे होतात मजबूत
एका अभ्यासानुसार दररोज दहा हजार पावले किंवा एक तास चालणे रक्तदाब कंट्रोल करण्यास मदत करते. तसेच हाडे मजबूत करण्यासाठी चालणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे हाडांची घनता वाढते. सकाळी वॉक करायला गेल्याने सूर्याची किरणे देखील शरीरावर पडतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन-डी मिळते. शरीरात पुरेसे व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम असल्यास हाडांच्या आजारांपासून आणि दुखण्यापासून आराम मिळतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दर आठवड्यात 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम आणि कमीत कमी मध्यम-तीव्रतेच्या पद्धतीने 21 मिनिटं चाललं पाहिजे. यामुळे हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. सोबतच हाडे मजबूत होतात आणि वजन देखील कमी होते.