नागपुर :- राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई स्थित ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भगवान विठ्ठलाची पूजा केली. मराठा संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता.
शासकीय पूजेची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पूजा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥
शासकीय निवासस्थानी मंत्रोच्चारात विठोबा-रखुमाईच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. पूजे नंतर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट वर बोलतांना म्हटले – आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
अधिक वाचा : व्हाईस ऑफ विदर्भ : 118 गायक कलावंतांची उपांत्य फेरीसाठी निवड