नागपूर : स्काइप, व्हीडिओ कॉल, व्हीसीद्वारे आजकाल अनेक महत्त्वपूर्ण बैठका केल्या जातात. सत्यनारायणाची पूजा आणि लग्नही आता ऑनलाइन होऊ लागले आहेत. परंतु नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मंगळवारी यासंदर्भातील कार्यवाही पार पाडण्यात आली.
नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी एक प्रकरण दाखल झाले. या प्रकरणातील पत्नी अमेरिकेत होती. तिला न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याला व्हीडिओ कॉल लावण्यात आला व तिची बाजू ऐकून घेण्यात आली. खटल्यातील पती नागपूरचा मूळ रहिवासी आहे. तर महिला परराज्यातील आहे. विवाहानंतर पतीला ‘मिशिगन अमेरिका’ येथे नोकरी लागली. त्यामुळे हे दाम्पत्य तेथे गेले. खटल्यातील पत्नी विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेली होती. अमेरिकेत गेल्यानंतर या दाम्पत्यामध्ये वाद वाढले. ते विकोपाला गेले. त्यामुळे त्यांनी काडीमोड घेण्याचा निर्यय घेतला. परंतु महिला विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेली होती. त्यामुळे आपण परत गेलो तर व्हिसा रद्द होऊन आपले शिक्षणच बंद होईल अशी भीती तिला होती. अखेर तिच्या पतीने भारतात आल्यावर नागपूर गाठले व घटस्फोटासाठी अर्ज केला. खटल्यादरम्यान त्याच्या पत्नीने अमेरिकेतून सगळी कागदपत्रे ‘नोटराइज’ केली. तिने ही कागदपत्रे भारतात पाठविली. या कागदपत्रांची खात्री पटविण्यात आली. तिने आपल्या सख्या भावाला ‘पावर ऑफ अर्टनी’ (मुख्यत्यारपत्र) दिले होता.
अंतिम सुनावणीच्या दिवशी पती, पतीचे वकील समीर सोनवणे, पत्नीचा भाऊ तसेच तिच्या वकील स्मिता सिंघलकर उपस्थित होत्या. सिंघलकर यांच्या मोबाइलवरून न्यायाधीशांच्या उपस्थितीत या महिलेला व्हॉट्सअॅपवरून व्हीडिओ कॉल लावण्यात आला. न्यायाधीशांनी दोघांची बाजू ऐकून घेतली. दोघांनी घटस्फोटाला संमती दर्शविल्याने न्यालायाने हा घटस्फोट मान्य केला.
अधिक वाचा : Couple, Both Ex-JNU Scholars, Allege Theft By Cops At Nagpur Home