सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली.
दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि अभिनेता धर्मेंद्र यांनी स्मृतींना उजाळा दिला. सायरा बानो दीर्घ काळानंतर घराबाहेर निघाल्या. या कार्यक्रमात घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलीप कुमार यांच्या पेंटिंग्जही बनवल्या.
या कार्यक्रमाबाबत कू करताना सुभाष घई यांनी लिहिलं, आज व्हिसलिंग वुड्समध्ये आमच्यासाठी एक भावुक करणारा खास दिवस उजाडला होता. आम्ही आपल्याला सोडून गेलेले एक महान कलावंत दिलीप कुमार यांची जयंती साजरी केली. मी त्यांच्यासोबत ‘विधाता’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा सिनेमांमध्ये काम केले. आम्ही सगळेच दिलीप कुमार यांच्या कायम ऋणात असू…’