नागपूर : नागपूर च्या धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊंड येथील आपली बसच्या डेपोत काही गुंडानी २० ‘आपली बस’च्या काचा फोडल्या व डेपो मधील इतर साहित्यांची देखील नासधूस केली. तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली.
माहितीनुसार १७ मार्च च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास एक चालक ड्युटी संपल्याने बस डेपोत जमा करण्यासाठी धंतोली येथील रस्त्यावरील विजेचा वायर बसच्या छताला अडक ल्याने तुटला. तो एका खाजगी कारला लागून त्याचे नुकसान झाले. तेव्हा शेजारच्या वस्तीतील लोकांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले. त्याच वादातून काल पहाटे काही गुंडानी बस डेपोत हल्ला करत २० ‘आपली बस’च्या काचांची तोडफोड केली.
या हल्ल्यानंतर डेपोचे कर्मचारी दहशतीत असून अजूनही कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
अधिक वाचा : 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, दोघांना अटक