नागपूर: भारतीय जनता पक्षाची स्थापना केवळ सत्तापरीवर्तनासाठी नव्हे, तर समाज बदलविण्याची मनिषा ठेवून झाली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भाजपच्या स्थापना दिवसानिमीत्त बोलताना म्हणाले. आजच्या दिवशी त्यांनी भाजपच्या सर्व कायकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
श्री गडकरी म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला. त्या मार्गावर चालून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केले आहे, करीत आहे. ज्या काश्मीरसाठी श्मायाप्रसाद मुखर्जींनी बलीदान दिले. त्या काश्मीरमध्ये आज कलम ३७० रद्द झाले. याचा आम्हाला अभिमान आहे. सरकारने सीटीझन बिल पास केल्यामुळे जे मुळ भारतनिवासी आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला आहे. प्रगतीच्या मार्गावर देश सातत्याने पुढे जात असल्याचा आनंद आहे.
संपूर्ण जगासह भारतावर कोरोनाचे संकट आहे. पण या संकटावर मात करुन आपण विजय निश्चीतच मिळवू. जनतेच्या सोबत राहून सामाजिक अंतर कायम ठेवण्याची आज गरज आहे. या स्थितीत देशातील गरीब लोकांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे रहावे आणि त्यांची सेवा करावी. कारण लोकसेवा, लोकसंघर्ष आणि लोकशिक्षण या त्रिसूत्रीवरच भारतीय जनता पक्ष उभा आहे. म्हणुनच आज संकटाने ग्रस्त लोकांना मदत करण्याचा संकल्प भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावा. देशातील शोषित, पिडीत, दलितांच्या उत्थानासाठी आपण कटीबद्ध आहो. नेहमी त्यांच्यासोबत राहण्याचा संकल्प आज करुया, असे गडकरी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील महासत्ता बनेल आणि आज आपण हाच संकल्प करुन पुढे गेले पाहीजे. सेवेच्या माध्यमातून गरजू लोकांची मदत करण्याचा संकल्प तमाम कार्यकर्त्यांनी करावा. भारतीय जनता पक्षाला इथपर्यंत आणण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर झटले, अनेकांनी बलीदान दिले. त्यांच्यामुळेच आपण आज हा दिवस पाहू शकलो. अशा कोट्यवधी कार्यकर्त्यांना अभिवान करुन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन स्थापना दिवसाच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.
Also Read- नागपुरात करोनाचा पहिला बळी, सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश