नागपुर :- १४ ऑगस्ट रोजी भिवापुर (उमरेड) येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेस्टर्न कॉल फिल्ड लिमिटेड प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून वेकोली प्रशासन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीच्या आईने केला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडललेल्या या घटनेनंतर भिवापुर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यावेळी दिल्लीतील निर्भयाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा होता मात्र उमरेडच्या या तरुणीला न्याय देण्यासाठी वेकोलिचे अधिकारीही तोंड लपवीत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र त्यानंतर ती पीडित तरूणीच्या आरोग्याबाबत किमान चौकशी करण्याची देखील वेकोलिचे अधिकारी घेत नसल्याचे समोर आले आहे. सध्या पीडितेवर नागपूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मात्र ती अजूनही धोक्याबाहेर आलेली नाही असे समजले जाते.
रूग्णालयात पीडीतेच्या सुरक्षेच्या नावाखाली ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमरेडसारख्या गु्न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात महिलांची ड्यूटी लावण्याचा प्रशासनाचा निर्णय अनाकलणीय असून यातून त्यांचा निष्काळचीपणा दिसून येतो. या संपूर्ण घटनेसाठी वेकोलिच्या वरिष्ठांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे, मात्र अजूनही कोणावर कारवाई करण्यात आणलेली नाही. दरम्यान पीडित तरुणीची प्रकृती अजूनही चिंताजनक असून किमान २ महिन्यांच्या उपचारानंतरच ती सामान्य होईल असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : सेकंड शादी डॉट कॉम के जरिये कई युवतियों को अपने जाल में फाँसनेवाला आरोपी गिरफ्तार