अपहरण करून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार

Date:

नागपूर : चाकूचा धाक दाखवून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना लकडगंज परिसरात उघडकीस आली. या घटनेने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

लकडगंजमधील मिनिमातानगर परिसरातील सहा वर्षे व चार वर्षे वयाच्या दोन चिमुकल्या मुली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात खेळायला गेल्या होत्या. खेळता खेळता त्या रस्ता विसरल्या. दोघी भटकत असल्याचे एका युवकाचे लक्षात आले. त्याने दोघींना ‘घरी सोडून देतो’, असे सांगितले. त्याने मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवले. दोघींनाही मिनिमाता रेल्वेलाइन जवळच्या हल्दीराम फॅक्‍टरीच्या पाठीमागील झाडाझुडपात नेले. तेथे चाकूच्या धाकावर दोघींसोबतही लैंगिक अत्याचार केला.

याच भागात हल्दीराम कंपनीचे कामगार काम करीत होते. एका कामगाराला या दोघी दिसल्या. दोन्ही मुलींचे कपडे रक्‍ताने माखलेले होते. त्यावरून मदतीस आलेल्या कामगारांना प्रकार लक्षात आला. त्यांना या मुलींना घराचा पत्ता विचारून घरी नेऊन दिले व त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले.

लकडगंज पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अनोळखी २० ते २५ वर्षीय युवकाचा शोध सुरू केला आहे.

अधिक वाचा : बदनामीच्या भीतीपोटी अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related