स्वतःचं जिम सुरु करण्यासाठी घरफोडी, दोन बॉडीबिल्डर्स अटकेत

Date:

नागपूर : स्वतःचं जिम सुरु करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून नागपुरातील दोन बॉडीबिल्डर्सनी चुकीचा मार्ग पत्करला. सहा लाखांची घरफोडी केल्याप्रकरणी दोघा बॉडीबिल्डर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अफसर खान आणि अक्रम खान अशी आरोपींची नावं आहेत. दिवाळीच्या सुट्टीत अनेक कुटुंबं फिरायला शहराबाहेर गेल्याची संधी साधून दोघा चोरट्यांनी घरफोडी सुरु केली होती.

दोघांनी काही दिवसापूर्वी कालिचरण ताकभवरे यांच्या घरी चोरी करत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यावेळी ताकभवरे कुटुंब हिमाचल प्रदेशातील कुलू मनाली ला फिरायला गेले होते. कालिचरण ताकभवरे यांच्या बंद घराचा कानोसा घेत आरोपींची मगच दार तोडत घरात प्रवेश केला. व सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या दोन बॉडीबिल्डर्स ना संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं. व त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करत अटक केली .

अधिक वाचा : विविध मागण्यांसाठी तरुणांची शहर बसवर दगडफेक

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related