नागपूर : पुढारी ऑनलाईन नागपूर महापालिकेच्या सर्वात चांगल्या असणाऱ्या रुग्णालयाची अवस्था आज उकिरड्या सारखी झाली आहे. काम जमत नसेल तर घरी जा, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपुरातही रुग्ण सापडले आहेत. काही नागरिकांना होम क्वारंटाईनवर ठेवले आहे. नागपूर महापालिकेचे डॅाक्टर्स प्रॅक्टिस करत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ज्यांना काम जमत नाही त्यांनी घरी जावे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज रहावे, असा आदेशही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. प्रशासनातील माहिती बाहेर कशी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दक्ष राहण्याच्या सुचनाही दिल्या. लॉकडाऊनचे पालन योग्यरित्या होत नसल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला.
Also Read- दहा तासांचे ऑपरेशन करोना