विदर्भातील संत्रा ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री

नागपूर

नागपूर : संत्र्यांचे विविध खाद्यपदार्थ तयार करून त्याद्वारे संत्र्यांची मागणी वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विदर्भातील संत्रा ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. नागपूर संत्र्याला मान्यता मिळवून देण्यात वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे मोठे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या ऑरेंज फेस्टीव्हलचे नागपूरमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हवामान खात्यात आता तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांना त्या माध्यमातून अंदाज देणार आहे. १० हजार गावांमध्ये अॅग्रो बिझनेससाठी नवी योजना राज्य सरकार आणणार आहे. साडेतीन हजार कोटी रुपये यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विदर्भातील संत्रा ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा : रामझुला उडाण पुलाच्या दुस-या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण