नागपूर : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत येत असलेला ‘माझा अगडबम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तृप्ती भोईर ही नाजुकाच्या रुपामध्ये झळकणार आहे. ‘अगडबम’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याच चाहत्यांना भेटण्यासाठी तृप्ती स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. ‘पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोयर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम ‘ चित्रपटातील नाजुका आपल्या अगडबम रूपात, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांच्या शहरात येणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये ती महाराष्ट्रमधील प्रसिद्ध देवींचे मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण जगाची प्रणितपालन असलेल्या जगदंबेचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथे असलेल्या स्थानिक लोकांशी ती संवाद देखील साधणार आहे .इतकेच नवे तर, महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शहरांध्ये माझा अगड्बम सिनेमातील या नाजुकाच्या ३५ फूट उंच कट आऊटचे यादरम्यान उदघाटन केले जाणार आहे.
प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणाय्रा या भव्यदिव्य कट आऊटमुळे, ठिकठिकाणी ऊत्साहात साजरा होत असलेल्या नवरात्री उत्सवाला चांगलाच रंग चढणार आहे. राज्यभरातील विविध सार्वजनिक नवरात्रीउत्सव मंडळामध्ये स्थानापन्न झालेल्या देवीचे वर्षें घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना अगडबम रूपातील नाजुकदेखील तिंथे भेटणार असल्याकरण्यामुळे, यंदाच्या उत्सवाला जत्रेचे स्वरूप लाभणार आहे . अभिनेत्री तृप्ती भोईरने साकारलेली नाजूक या व्यक्तिरेखेने यापूवीदेखील ‘अगडबम’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांचे माने जिंकली होती .त्यामुळे येत्या २६ ओक्टोम्बर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘माझा अगडबम’या सिक्वलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
‘माझा अगडबम’ या सिनेमाचा हा ट्रेलर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. ‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.
तसेच या सिनेमाच्या सहनिर्मात्यांच्या फळीत रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांचा समावेश आहे. बल्लू सलुजा यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर या मराठीतील आघाडीच्या गीतकारांच्या गाण्यांना टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. असा हा दर्जेदार कलाकृतीने नटलेला ‘माझा अगडबम’ सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरेल, यात शंका नाही.