भिवापूर येथे ट्रकने ३ विद्यार्थ्यांना चिरडले : एकाचा जागीच मृत्यू

Date:

नागपुर : नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र भिवापूर येथे भरधाव ट्रकने ३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना शनिवारी घडली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर, २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यातील एकीची परिस्थती अत्यंत नाजुक असल्याचे सांगितले जाट आहे.

प्राप्त माहिती नुसार शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यलयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. महिन्यापूर्वी याच मार्गवर टिप्परने २ शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना झाली होती. ती घटना ताजी असतानाच हा अपघात घडला आहे. वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

घटने नंतर गावातील संतप्त नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले असून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेणे सुरु आहे

अधिक वाचा : सिरियल किलर ; त्याने केली ३३ ट्रक चालकांची हत्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related