नागपूर / लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसची उभ्या कंटेनरला धडक, 4 प्रवाशांचा मृत्यू तर 12 जखमी

नागपूर – नागपूर मौदा मार्गावर शनिवारी सकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या बसमध्ये 30 प्रवासी होते. लग्नावरून परतत असताना हा अपघात झाला.

नागपूर पोलीस दलातील कर्मचारी अमित झीलपे यांच्या लग्नसमारंभावरून वऱ्हाड परत येत होते. दरम्यान वऱ्हाड घेऊन निघालेली बस नागपूर-मौदा मार्गावरील शिंगोरी गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. या अपघातात मधील 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 5-6 जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.