नागपुरात ‘एअर शो’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

Date:

मध्य भारतातील युवकांना वायुदलाकडे आकर्षित करण्यासाठी वायुसेना दिनाच्या निमित्ताने दर दोन-तीन वर्षांनी नागपुरात ‘एअर शो’ आणि ‘स्ट्रेटेजिक डिस्प्ले’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. नागपुरातील वायुदलाच्या मेंटनन्स कमांडकडून मुख्यालयाकडे अद्याप प्रस्ताव सादर झाला नसल्याची माहिती आहे.

वायु दलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे ध्यानात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ८ ऑक्टोबर या वायुदलाचा स्थापना दिनी येथे एअर शो यासारखे उपक्रम घेतले जातात.

दिल्लीतील मुख्यालयात एअर शो दरवर्षी ठरलेला असतो व इतर ठिकाणी वेगवेगळ्या वर्षांत घेतला जातो. त्यानुसार नागपुरातही दर दोन ते तीन वर्षांनी हा शो होत होता. २०१३ आणि २०१५ ला येथे एअर शो झाले. त्यानंतर हा शो गेल्यावर्षी होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यावर्षी नागपूरचा दावा आहे. मात्र, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी हा ‘शो’ होणायाची शक्यताही मावळताना दिसत आहे, असे वायुदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली मुख्यालयात दरवर्षी एअर शो होतो, इतर ठिकाणी होईल की नाही निश्चित नसते. यावर्षीचा कार्यक्रम देखील आलेला नाही. मुख्यालयाकडे विनंती करण्यात आली काय, असे विचारले असता विनंतीने एअर मिळत नसतो. रोटेशन पद्धतीने शोसाठी शहराची निवड केली जाते. असे त्यांनी स्पष्ट केले. एअर शो करणारी चमू हैदराबादला असल्याने दिल्लीकडे जाण्यापूर्वी किंवा तिकडून येताना नागपुरात सादरीकर करण्याचे नियोजन केले जाते. ही चमू दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाआधी सरावासाठी दिल्लीला जात असते. त्यानुसार नागपुरातील शोचे अनेकदा नियोजन झाले आहे.

अधिक वाचा : रमण विज्ञान केंद्र येथे पाण्याविषयी माहीत करून घ्या खूप काही…

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related