नामांकित कंपन्यांच्या नावाने गुलाबजामूनच्या नकली पिठाची विक्री, विक्रेते अटकेत

Date:

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ या पथकाने गुलाबजामून तयार करण्याच्या पावडरचे (भुकटी) पॅकिंग असलेले प्रॉडक्ट जप्त केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी एका कारखान्यावर धाड टाकून त्या कारखान्याला सीलदेखील केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांना आवडणारे गुलाबजामून प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमांच्या मेन्यूची शोभा वाढवत असते. मात्र, गेल्या काही काळात गुलाबजाम तयार करणारे पावडर भेसळयुक्त किंवा नकली पावडर बाजारात उपलब्ध झाल्याने गुलाबजामची चव कडू झाली आहे.

नागपूरच्या बाजारपेठेत नामांकित कंपनीचे नकली गुलाबजाम मिक्सचे पाकिटे विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुण्याच्या चितळे कंपनीने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रार समजताच पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली.

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने कळमना परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या एका कारखान्यावर धाड टाकली. त्यावेळी तिथे नामांकित कंपन्यांचे लेबल असलेले नकली गुलाब जामून पावडर तयार केले जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी दीपक तलरेजा आणि जयेश लखनाणी अशा दोघांना अटक केली आहे.

अधिक वाचा : हेल्मेट न घातल्याने जाब विचारणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related