ताडोबा वन क्षेत्रात विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू

Date:

नागपुर : ताडोबा वन क्षेत्रात एका शेतात ३ वर्ष वयाचा वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गावापासून जवळच भामडेळी येथील शेताच्या कुंपणाला सोडलेल्या विजप्रवाहाच्या धक्क्यामुळे वाघाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या प्रकरनात ऋषी ननावरे या शेतकऱ्याला वनवीभागाने ताब्यात घेतले असून पुढिल तपास सुरु आहे.

माहिती नुसार ताडोबाच्या बफर क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या वाघाचा शनिवारी भामडेळी येथे आढळल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहेत. जंगलालगत असलेल्या शेतातील पीकाचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने कुंपणाच्या तारेला विजेचा प्रवाह सोडला होता. शनिवारी सकाळी ६ वाजताण्याच्या सुमारास वाघ या तारांच्या संपार्कात येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. भीतीपोटी शेतकऱ्याने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळी ही माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तत्काळ वनअधिकारी घटनास्थळी पोचले. वनविभागाने मृत वाघाला ताब्यात घेतले असून त्याचे मोहर्ली येथील रोपवाटिकेत शवविच्छेदन करण्यात आलं.

महत्वाचे म्हणजे या वाघाला कॉलर आयडी लागलेली होती. त्यामुळं त्याचं प्रत्येक लोकेशन वनविभागाला माहिती होतं. असं असतानाही सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, हा बेताचा प्रश्नच निर्माण झाला आहे. माहिती असो मागील महिन्यात रेल्वेच्या धडकेने वाघाचे तीन बछडे ठार झाले होते. त्यानंतर पुन्हा वाघाचा मृत्यू झाल्याने राज्यातील वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अधिक वाचा : अतिक्रमण, नाले सफाई, सांडपाण्याबाबत तात्काळ कारवाई करा : महापौर नंदा जिचकार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related