नागपुर : जवळ अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक

नागपुर

नागपुर :- जुनी कामठी आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ कुख्यात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

माहिती नुसार जुनी कामठी परिसरातील ३५ वर्षीय निखिल चौकसे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक करून देशी बनावटीची लोखंडी धातूची पिस्टल मॅगझिन ताब्यात घेतली आहे.

तसेच नंदनवन हद्दीतील ३३ वर्षीय मोहसीन अन्सारी आणि ४० वर्षीय सुरेश यादव या २ आरोपींवर देखील मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यातील आरोपी मोहसीन अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर छिंदवाडा मध्यप्रदेश मध्ये खून, बलात्कार आणि चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. हा मध्य प्रदेशातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार असून त्याने पळून नागपुरात आल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणात ३ आरोपींकडून ३ पिस्टल, १ देशी कट्टा आणि ५ जिवंत काडतुस असा एकूण शस्त्रसाठा शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा : जी.एस. कॉलेज के 12 वी के छात्र की मौत होने पर परिजनों द्व्रारा सीताबर्डी पुलिस स्टेशन में हंगामा