प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक हजार घरे बांधणार : २०१ कोटीच्या कामांसाठी संचालक मंडळाची मंजुरी

Date:

नागपूर :- नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्याच्या कामाला नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. गुरूवारी (ता.१९) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका मंगला गवरे, पराग दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे. चार हजार पैकी तीन हजार घरे हे पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असून एक हजार घरे हे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार आहेत. एक हजार घरे हे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने बांधण्यात येणार आहे.

याकामाला एकूण २०१ कोटीचा खर्च अपेक्षित असून त्याला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.

अधिक वाचा : बुटीबोरी-हिंग़णा औद्योगिक क्षेत्र आदर्श नगर परिषद म्हणून उदयास यावे – नितीन गडकरी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...