चंद्रपूर : चंद्रपूर जिह्यातील जुनोना जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथे गुरुवारी सकाळी दोन मृतदेह आढळले होते. संध्याकाळ होता होता ट्रॅकवर आणखी एका बछड्याचा मृत्यू झाला आहे. रेल्वे मार्गावर 2 बछडे मृत पावल्याची घटना सुरुवातील समोर येताच परिसरात खळबळ उडाली. बछडय़ांचे वय 7 ते 8 महिने असल्याचा अंदाज आहे.
गुरुवारी सकाळी दोन बछड्यांची मृतदेह रेल्वे रुळावर ज्या ठिकाणी आढळले होते तिथूनच जवळपास तीनशे मीटर अंतरावर तिसऱ्या बछड्याचे मृतदेह सापडला आहे.
अधिक वाचा : रेल्वेखाली चिरडून वाघाचे दोन बछडे ठार
जुनोना जंगलातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग जातो. सकाळी निघणाऱ्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेने हा अपघात झाला. सकाळी हे बछडे रेल्वे मार्गावर खेळत असावेत तेव्हा अचानक आलेल्या रेल्वेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या बछड्यांच्या आईचा शोध आता सुरू करण्यात आला आहे कारण जर बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला असेल तर मग वाघीणही अशाच पद्धतीने जखमी होऊ शकते किंवा मृत्यूमुखी पडू शकते असा संशय वर्तवला जातोय.