नागपूर, ता. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यातही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागांतील १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा, भाजीपाला, दूध, औषधी आदींचा समावेश आहे. या वस्तूंची दुकाने शहरात सुरू राहतील. मात्र या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या सेवांमध्ये औषधी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून गरजू व्यक्तीना २४ तास औषधी मिळावी या हेतूने मोजकी मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य मेडिकल स्टोर्स दिवसा नियमित वेळेत सुरू असतील.
‘ही’ मेडिकल स्टोर्स सुरू राहणार २४ तास
लोकमत चौकातील जैन मेडिकल, प्रिन्स मेडिकोज, गेटवेल हॉस्पिटल धंतोली येथील गेटवेल फार्मसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ड्रग स्टोर्स, मेडिकल चौकातील हार्दिक मेडिकल, धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन फार्मसी, सीआयआयएमएस हॉस्पिटल येथील सीआयआयएमएस फार्मसी, कस्तुरचंद पार्कजवळील किंग्जवे हॉस्पिटल येथील किंग्जवे फार्मसी, टेलिफोन एक्सचेंज चौकातील न्यू एरा हॉस्पिटलची न्यू एरा फार्मसी, सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथील सेवन स्टार फार्मसी आणि नॉर्थ अंबाझरी मार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलची व्होकार्ट फार्मसी ह्या १२ फार्मसी २४ तास सुरू राहतील.