त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगताप यांची टीका

त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगतापांची यांची टीका

नागपुर :- नागपुररात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेमध्ये काँग्रेस चे आमदार भाई जगताप यांनी भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष अमित शाह यांचा तडीपार असा उल्लेख करत त्यांचावर टीका केली. जगताप यांनी केलेल्या आरोपामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. धुळ्यातील राईनपाडा येथील डवरी गोसावी समाजाच्या चार जणांच्या हत्येप्रकरणावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान हा गोंधळ उडाला.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात भारतीय संविधानामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, असे वक्तव्य केले होते. या एका वक्तव्याचा आधार घेत भाजप आमदार भाई गिरकर यांनी काँग्रेसच्या संविधानात दुसऱ्यांना अध्यक्ष करण्याची तरतूद नसल्याचे वक्तव्य केले. त्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी हरकत घेतली.

काँग्रेसचे आत्तापर्यंत ७२ अध्यक्ष झाले, त्यात केवळ चार गांधी घराण्याचे सोडले तर बाकी सर्व विविध जाती धर्म आणि पंथांचे होते. पण त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता, असे खणखणीत प्रतिउत्तर भाई जगताप यांनी सभागृहात यावेळी दिले.जगताप यांच्या या आरोपावर भाजपच्या अनेक सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र उपसभापतींनी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. तर काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल वक्तव्य करणारे भाजपाचे सदस्य भाई गिरकरही पुढे जगताप यांच्या विधानावर उत्तर देऊ शकले नाहीत.

अधिक वाचा : राज्यात दारूबंदी करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे