कर्नाटकातील मणिपाल येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात एक दुर्मीळ रक्तगटाची व्यक्ती सापडली आहे. या रक्तगटाचे नाव पीपी अथवा पी नल फेनोटाईप असे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार असा रक्तगट असलेली ही देशातील पहिलीच व्यक्ती आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती.कस्तुरबा रुग्णालयातील ब्लड बँकेत रुग्णाचा रक्तगट माहित करून घेण्यासाठी सॅपल पाठवले. डॉक्टरांनी रक्त तपासले मात्र त्यांना रक्तगटाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक असे 80 वेळा सॅपल पाठवले. पण रुग्णाच्या रक्तगटाचा काही शोध लागला नाही. या प्रकारामुळे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. संबंधित रुग्णाच्या रक्त गटाचा शोध लावण्यासाठी रक्तासंदर्भातील आजारांची देखील तपासणी व चौकशी झाली. या कामासाठी डॉक्टरांचे एक पथकच कामाला लागले होते. पण त्याच्या हाती काहीच लागले नाही.
शेवटी डॉक्टरांनी त्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरेंस लॅबरोटरी (आयबीजीआरएल) ब्रिस्टर, इंग्लंड येथे पाठवले. या लॅबने संबंधित रुग्णाच्या रक्ताचा गटाचा शोध लावला. हे रक्तगट पीपी फेनोटाइप सेल्स या नावचे असल्याचे लॅबने सांगितले.
भारतात अशा प्रकारचा रक्तगट सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डॉ.पूर्णिमा बलिगा यांनी सांगितले. अशा प्रकारचा रक्त गट शोधून काढल्याबद्दल डॉ.बलिगा यांनी ब्लड बँकेचे देखील कौतुक केले आहे. या रक्तगटाबद्दल अधिक माहिती देताना प्राध्यापक शामी शास्त्री म्हणाले की, रुग्णाच्या शरीरात अतिशय दुर्मीळ असलेला रक्तगट म्हणजे पी नल आणि ऐंटी पीपी 1 पीके ऐंटी बॉडी रक्त होय. ज्या रुग्णाच्या शरीरात हा रक्त गट सापडला त्याच्यावर अखेर रक्ताशिवाय शस्त्रक्रिया करण्यात आली.
अधिक वाचा : पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा