केळीबाग रोड रुंदीकरण कार्यवाहीला वेग

Date:

नागपूर :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केळीबाग रस्ता ८० फूट रूंदीकरणाच्या कार्यवाहीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. बुधवारी (ता. १) केळीबाग मार्गावरील २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आले. सदर कार्यवाही बाजार विभागाचे सहायक आयुक्त विजय हुमने, सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

केळीबाग मार्गावरील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ही कार्यवाहीच्या वेळी बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, मदन सुभेदार यांच्यासह अतिक्रमण आणि बाजार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : १५ ऑगस्टला जमादार व स्वच्छता निरीक्षकांचाही सत्कार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related