डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरातील पवित्र दिक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीची मूहूर्तमेढ रोवली, या सामाजिक क्रांतीच्या साक्षीदार असलेला दिक्षाभूमी परिसरातत नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी देश –विदेशातून लाखो भिमसैनिक येत असतात. या भिमसैनिकांची तृष्णा भागविण्याचे कार्य म.न.पा. मागासवर्गीय कर्मचारी संघटना हि नागपूरातील स्वंयसेवी संस्था समता जेसिस, ब्ल्यु गार्ड व संजीवणी संखी संघाच्या संयुक्त विद्यमाने मोठया प्रमाणात करीत असते. त्यांचे कार्य हे अभिनंदनीय असून गरिबांची सेवा हिच खरी मानव सेवा असल्याचे मनोगत उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलींद माने यांनी या सेवाभावी स्टॉलच्या उदघाटणा प्रसंगी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर श्री. प्रवीण दटके, म.न.पा.चे अपर आयुक्त श्री. अझीझ शेख, प्रसिध्द न्युरोलाजीस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, नगरसेवक श्री.किशोर जिचकार, म.न.पा.आरोग्य अधिकारी डॉ.सूनिल कांबळे, कार्यकारी अभियंता श्री. अमिन अख्तर, कार्यकारी अभियंता (ज.प्र.) श्री.मनोज गणविर, म.न.पा.दुर्बल घटक समितीचे माजी अध्यक्ष प्रा.राजेश नगरकर, वैदकीय अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार व डॉ.विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, प्राचार्य रमेश माटे, जनसंपर्क अधिकारी श्री.अशोक कोल्हटकर, कॅप्टन श्रीधर मेश्राम, म.न.पा.कर्मचारी नेते श्री. राजेश हाथीबेड, दंत चिकीत्सक डॉ. साकीब पटेल, राज फुले, डॉ.दिपंकर भिवगडे, आर्की. कल्पना मेश्राम, विभा गजभीये, ॲङ पी.टी. खोब्रागडे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना माजी महापौर श्री. प्रविण दटके म्हणाले, पाणी हे जीवन आहे व पाणी पाजने हे पून्य काम आहे. म.न.पा.मागासवर्गीय कर्मचारी संघटनाने वेगळापणा जोपासून तृष्णातृप्ती करित आहे त्याबध्दल प्रशंशा व्यक्त केली.
श्री. अझीझ शेख : म.न.पा.चे अपर आयुक्त श्री. अझीझ शेख म्हणाले, सतत २५ वर्षापासून नि:शुल्क सेवा देत आहेत, अशाप्रकारच्या सेवेतून पून्य प्राप्त होते. पुढील पिढीला प्रेरणा मिळते. यापूढेही हे सेवा कार्य असेच सुरु राहील असा विश्वास व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक म.न.पा.चे जनसंपर्क अधिकारी व म.न.पा.मागासवर्गीय कर्मचारी संघटना व समता जेसिसचे सचिव श्री.अशोक कोल्हटकर यांनी माहिती देतांना सांगितले की, या सेवेला २५ वर्ष पूर्ण झाले, २५ वर्षापासून पाणी वाटप, तृष्णतृप्ती व आरोग्य शिबीर औषध वितरण, बुंदी, नि:शुल्क चष्मे वितरण व दंत चिकीत्सा शिबीराला समाजातील सर्व स्तरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळते एक सामाजिक वारसा जोपासण्याचे कार्य सर्वाच्या सहकार्याने करित असल्याची माहिती दिली.
पाहूण्यांचे स्वागत म.न.पा.कर्मचारी संघटनेचे श्री.राजेश हाथीबेड, राजकुमार वंजारी यांनी केले. समता जेसिसचे श्री. सुरेन्द्र रामटेके, संजीवणी सखी संघाच्या सचिव विभा गजभीये यांनी केले. यावेळी १ लक्ष पाणी बॉटल, नि:शुल्क चष्मे वितरण, आरोग्य तपासणी व औषध वितरण, चिवडा बुंदी व पारले बीस्कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यास्तव राजकुमार वंजारी, विनोद धनविजय, डॉ. छत्रपाल गायकवाड, डॉ.श्याम शेंडे, डॉ.शंकर कुडवे, श्री.दिलीप तांदळे, सौ. पमिता कोल्हटकर, छाया खोब्रागडे, रंजन बोरकर, अंबादास राहाटे, विजय नगरकर, सुनंदा कोचे, पूजा राहाटे, निलू बोरकर, वंदना देशभ्रतार, वैशाली कामडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सर्वांचे आभार दिलीप तांदळे यांनी मानले.
अधिक वाचा : भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस