नागपूर : मा.अति.आयुक्त श्री.राम जोशी यांनी दिनांक २१.०९.२०१८ ला शिक्षणाधिकारी सहा.कार्यक्रम अधिकारी, सहा. शिक्षणाधिकारी, सर्व शाळा निरीक्षक माध्यमिक व प्राथमिक पायलट शाळेचे मुख्याध्यापक यांची सभा घेऊन म.न.पा.च्या शाळेमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे ठरविले आहे.
पायलट शाळेमध्ये मनपाच्या शाळांच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढ करावयाची आहे याकरीता तीन महीन्यात या शाळांनी आदर्श निर्माण करुन इतर म.न.पा.शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत शाळांमध्ये वर्ग १ ली पासून इंग्रजी सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे. जेणेकरुन या शाळांची रंगरंगोटी करणे, शाळेत पालक सभा घेणे इत्यादी सुविधा करुन देण्याचे ठरविले आहे.
दि. २९.०९.२०१८ ला सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व २२ पायलट शाळेमध्ये नगरसेवक व पालक यांचा Maha PTM मध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहे.
१ डिसेंबर, २०१८ ला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना शाळा दत्तक घेण्यास सांगावे, शाळेत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण या कार्यक्रमाकरीता नगरसेवक, शिक्षणतज्ञ, शिक्षण विभागाचे अधिकारी यांना निमंत्रीत करावे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्थांचा (N.G.O.) सहभाग घ्यावा व शाळेकरीता नाविण्यपूर्ण काय करता येईल याचा विचार करुन दर दोन दिवसांनी मुख्याध्यापकांनी आढावा घ्यावा.
प्रत्येक झोनमध्ये पायलट शाळेतील एका शिक्षकांचे Estate Manager ची जबाबदारी सोपवावी, प्रत्येक शाळेनी डेडस्टॉक रिकार्ड व्यवस्थीत ठेवावा, शिक्षण सभापतींचा प्रेरणेने काही शाळा डिजीटल झाल्या आहेत. त्यामुळे पायलट शाळा तयार करण्यास अडचण येणार नाही. झोनचा शाळा निरीक्षकांनी याबाबत अति.आयुक्त यांचा नेहमी संपर्कात राहावे, अशी सूचना देण्यात आली.
पायलट शाळेंची नांवे खालीलप्रमाणे
झोन क्र १ : विवेकानंद नगर हिन्दी प्राथ व माध्यमिक शाळा, एकात्मता नगर उच्च प्रा.शाळा
झोन क्र. २ : वाल्मीकीनगर हिन्दी प्राथ. व माध्य.शाळा,प्रियदर्शीनी उच्च प्राथ.शाळा
झोन क्र ३ : लालबहादूरशास्त्री हिन्दी माध्य., दुर्गानगर मराठी प्राथ. शाळा
झोन क्र ४ : नेताजी मार्केट हिन्दी माध्य. जाततरोडी हिन्दी उच्च प्राथ., डॉ.बाबासाहेब आंबेडकर माध्य. शाळा
झोन क्र ५ : ताजाबाद उर्दु माध्य. दत्तात्रयनगर मराठी माध्य. शाळा
झोन क्र ६ : पन्नालाल देवडीया हिन्दी माध्य., सानेगुरुजी उर्दु माध्य.शाळा, हाजी अ.मजीद लीडर मुले उर्दु प्राथ. शाळा
झोन क्र ७ : नयापूरा हिन्दी उच्च् प्राथ.शाळा, कुंदनलाल उर्दु माध्य.शाळा
झोन क्र ८ : डॉ.राममनोहर लोहीया माध्य.शाळा, मिनिमातानगर हिन्दी प्राथ.शाळा, पारडी मराठी प्राथ.शाळा
झोन क्र ९ : एम.ए.के.आजाद उर्दु माध्य.शाळा, वैशालीनगर हिन्दी उच्च प्राथ.शाळा
झोन क्र १० : आरबीजीजी हिन्दी माध्य.शाळा, मकरधोकडा हिन्दी उच्च प्राथ.शाळा
अधिक वाचा : ग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत बस चा मोफत प्रवास