राष्ट्रीय स्तरावरील महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेचा थाटात समारोप

Date:

नागपूर : नागपूर महानगर पालिका, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, नागपूर तिरंदाजी संघाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धेचा येथील रेशीमबाग मैदानावर मंगळवारी (ता. १३) सायंकाळी शानदार समारोप झाला. ९ वर्षाखालील मुलींच्या गटात आंध्रप्रदेशची भूपतीराजू तनिष्का, राजस्थानची खुशी कुमावत, यशी शर्मा, तर मुलांच्या गटात शिवम चिखले (महाराष्ट्र), अथर्व शर्मा (राजस्थान), सुदान प्रेम (तामीळनाडू) हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रतीक थोरवे (महाराष्ट्र), अभयसिंह (झारखंड), रितिक चंहाल (दिल्ली) तर मुलींमध्ये जागृती कुंडे (महाराष्ट्र), कोमलिका बारी (झारखंड), इशा पवार (महाराष्ट्र), १४ वर्षाखालील मुलांच्या गटात उमेश मंडल (झारखंड), बिशाल चांगवई (महाराष्ट्र), सुनीलकुमार मौर्य (महाराष्ट्र) यांनी सुवर्णपदक पटकाविले.

अन्य पदक पटकाविणाऱ्यांमध्ये ९ वर्षाखालील मुलांच्या गटात तुरी पिंगुआ, वेस्ट सिंगभूम (रौप्य), विक्रम राज, छत्तीसगड (कास्य), संभ्रण सर्वेश, तामीळनाडू (रौप्य), व्योम ढाका, उत्तर प्रदेश (कास्य), तनिष लेंडे, महाराष्ट्र (रौप्य), अनुप अश्विन, तामीळनाडू (कास्य), मुलींमध्ये कुमकुम मोहोड, महाराष्ट्र (रौप्य), शर्वरी शेंडे, महाराष्ट्र (कास्य), रायजस कौर, चंदीगड (रौप्य), गौरी ढवळे, महाराष्ट्र (कास्य), मीनल पंघाल, हरियाणा (रौप्य), रियांशा वाभळे, महाराष्ट्र (कास्य), १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अथर्व शिर्के, महाराष्ट्र (रौप्य), सत्यम पाटील, महाराष्ट्र (कास्य), श्रीरा राजूरकर, महाराष्ट्र (रौप्य), सोनुकुमार महतो, झारखंड (कास्य), १७ वर्षाखालील मुलींच्या गटात कोमल डावरे, महाराष्ट्र (रौप्य), धनश्री जाधव, महाराष्ट्र (कास्य), केविकिनो रिखा, नागालॅण्ड (रौप्य), गुरुमेहर कौर, चंदीगड (कास्य), किर्तना रमेश, कर्नाटक (रौप्य), रिया पाकळे, महाराष्ट्र (कास्य), १४ वर्षाखालील मुलांच्या गटात क्रिष्णा पिंगुआ, झारखंड (रौप्य), हर्षद दैत, महाराष्ट्र (कास्य), प्रवीण बाशीग्म, पुद्दुचेरी (रौप्य), यमनकुमार, महाराष्ट्र (कास्य), अजित श्रीराम, महाराष्ट्र (रौप्य), आदित्य गदाधे, महाराष्ट्र (कास्य) यांचा समावेश आहे.

समारोप कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक राजेश घोडपागे, संजय चावरे, नगरसेविका कल्पना कुंभलकर, प्रशिक्षक शिशीर सुदामे, शैलेश तीनखेडे, राजू कावरे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, नागपूर तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष मुकुल मुळे, संजय कहुरके उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपुरात आयोजित तीन दिवसीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन एक सुंदर आयोजन होते. अशा प्रकारच्या आयोजनामुळे खेळाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी विजेत्यांना महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी असंख्य क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.

अधिक वाचा : ‘छठ पूजा’ एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव : महापौर नंदा जिचकार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related