नागपूर : भरधाव कार खांबावर आदळली; चालक ठार, तिघे जखमी

Date:

नागपूर : हिंगणा मार्गावर एमएच-२३-एफ-५८६७ या क्रमांकाची भरधाव कार विजेच्या खांबावर आदळून चालक ठार तर तिघे जखमी झालेत. या घटनेत महिला डॉक्टर थोडक्यात बचावली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. सनी देविदास करोसिया, असे मृतकाचे, तर सौरभ गादेकर, शुभम व अन्य एक अशी जखमींची नावे आहेत. चार जण कारने जात होते. कारचा वेग १०० किमी होता.

कार अनियंत्रित झाली. यावेळी महिला डॉक्टर घरी जात होती. ती थोडक्यात बचावली. कार विजेच्या खांबावर आदळून झाडावर धडकली. चक्काचूर झाली. सनी हा कारमध्ये फसला. महिला डॉक्टरने नागरिकांच्या मदतीने सनीला बाहेर काढले. तो मृत होता. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपुरात रेल्वेत सापडली जिवंत काडतुसे

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...