पोलीस ठाण्यासमोर १३ वर्षीय मुलाला चिरडले

Date:

नागपूर : एका भरधाव जीपने १३ वर्षीय विद्यार्थ्यांला पोलीस ठाण्यासमोरच चिरडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सागर एकनाथ मोकासे रा. ताजनगर, असे मृताचे नाव आहे. तो आठव्या वर्गात शिकत होता.

सागर याचे वडील एकनाथ यांचा हारफुलांचा व्यवसाय आहे. सागरला स्वेटर हवे होते. कोराडी पोलीस ठाण्यासमोर स्वेटर्सची दुकाने लागली आहेत. एकनाथ त्याला घेऊ न तेथे गेले. रस्ता दुभाजकाजवळ सावनेरकडे जाणाऱ्या भरधाव जीपने त्याला चिरडले. जीपसह चालक पसार झाला.

याबाबत कळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. सागरला मोठी बहीण आहे. सागरच्या मृत्यूने मोकासे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

अधिक वाचा :  क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार; गंभीर जखमी

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related