रोहित शर्मा च्या वादळी आणि शतकी खेळीने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. ७ गडी राखून टीम इंडियाने विजयी मिळवला. रोहितने ५८ चेंडूंत ११ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारली. टीम इंडियाने ही मालिका २-१ ने खिशात घातली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना निर्णायक टी-२० सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता, हे या विजयावरुन स्पष्ट झालेय.
रोहित शर्मा ने आक्रमक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने रोहित शर्मा च्या शतकी खेळीवर हा सामना सहज जिंकत मालिकाही जिंकली.
शिखर धवनने चांगली सुरुवात करुन दिली. मात्र तो लगेच बाद झाला. लोकेश राहुलचा ख्रीस जॉर्डनने जबरदस्त झेल पकडला. रोहित शर्मा ला आज चांगला सुर सापडला. रोहितच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्यात. रोहितने झटपट अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीचा जम बसू लागला होता. रोहितचे काही षटकार असे होते की विराट चक्रावून गेला.
बरोबर १० षटके पूर्ण होताना भारताच्या धावांचे शतक फलकावर लागले. षटकामागे १०धावांची सरासरी राखायला विराट – रोहितला फारसे कठीण जात नव्हते. ८९ धावांची भागीदारी करुन विराट जॉर्डनला ४३ धावांवर बाद झाला. सुरेश रैना आणि धोनी अगोदर हार्दिक पंड्याला बढती देण्यात आली.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्यात.त्यानंतर प्रत्येक इंग्लिश खेळाडूंनी आपली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.
दरम्यान, टीम इंडियाकडून खराब क्षेत्ररक्षण झाले. त्यामुळे टीम इंडियाकडून चांगलीच निराशा झाली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दीपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
अधिक वाचा : फिफा वर्ल्ड कप २०१८ : ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत