Suicide हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे.
सुपौल – बिहारच्या सुपोल परिसरात एकाच कुटुंबातील ५ सदस्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माहितीनुसार, ३ मुलांसह पती-पत्नीने एकाच रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नीसह २ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले, ज्यावेळी या रुममधून दुर्गंध बाहेर येऊ लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे. रुममधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजारील लोकांनी दरवाजा ठोठावला, पण काहीही उत्तर मिळालं नाही, त्यानंतर लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलवण्यात आले, पोलिसांनी या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
पोलिसांच्या Suicide माहितीनुसार, ज्यावेळी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा ५ सदस्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहायला मिळाले, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि तातडीने तपासाला सुरुवात केली, सुपौल येथे एसपी मनोज कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. सध्या हे प्रकरण आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
एसपी मनोज कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, या कुटुंबातील प्रमुख व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यात यश आलं नाही असं शेजाऱ्यांनी सांगितले, कुटुंब कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, कुटुंबात कोणीही जास्त शिकलेले नाही, फक्त मुलगा शिक्षण घेत होता, मुलींना शिक्षण नव्हतं, सध्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर या ५ जणांच्या मृत्यूबाबत स्पष्ट सांगता येईल, सध्या तपास सुरु असल्याने काहीही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं, मात्र एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
हिवाळ्याच्या थंड आणि गडद महिन्यांत आत्महत्येचे प्रमाण अत्युत्तम आहे असा सर्वसाधारण समज असूनही आत्महत्येच्या प्रमाणांवर मौसमी दुष्परिणामांवरील संशोधन असे सूचित करते की वसंत lateतुच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे..