नागपूर, ता. २७ : कोव्हिड-१९ संदर्भात मनपातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपातर्फे विलगीकरण केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने मनपाला किती निधी मिळाला, यासह विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिका-यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करा तसेच कोव्हिड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिका-यांची आयुक्तांसोबत बैठक एक आयोजित करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.
नागपूर शहरातील कोव्हिड-१९ संदर्भात सद्यस्थिती, मनपातर्फे करण्यात आलेल्या महत्वपूर्ण उपाययोजना आणि मनपातर्फे उभारण्यात आलेले विलगीकरण कक्षामधील व्यवस्थेचा बुधवारी (ता.२७) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) डॉ.प्रदीप दासरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती, बरे झालेले रुग्ण, बाधित झोन, विलगीकरण कक्ष व त्यातील व्यवस्था, विलगीकरण कक्षातील संबंधित अधिका-यांचे कार्य या सर्व बाबींचा आढावा घेतला. प्रशासनातर्फे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई यांनी माहिती सादर केली. डॉ.सवाई यांनी सांगितले की, नागपूर शहरात ११ मार्चपासून आजपर्यंत ४१४ कोरोना रुग्ण संख्या असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३३७ पूर्णपणे बरे झालेत व सद्यस्थितीत ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये अशा गंभीर स्थितीत एकही रुग्ण नाही. सद्यस्थितीत शहरातील लक्ष्मीनगर झोन वगळता इतर नउही झोनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. रुग्णांच्या संपर्कात येणा-यांच्या व्यवस्थेसाठी मनपातर्फे आठ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. सर्व विलगीकरण कक्षात एकूण १६२५ जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या आठही विलगीकरण कक्षातील व्यवस्थेसाठी मनपातर्फे आठ व्यक्तींकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी डॉ.योगेंद्र सवाई यांनी दिली.
विलगीकरण कक्षामध्ये गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमार्फत नगरसेवकांकडे केल्या जातात. त्यामुळे मनपाच्या सर्व विलगीकरण कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिका-यांचे नाव व त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. बैठकीमध्ये अनुपस्थिती अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे राधास्वामी सत्संग न्यास या ठिकाणावरून प्रत्येक कॉरेंटीन सेंटरवर अल्पोपहार व जेवन पोहोचविण्याची व वितरीत करण्याकरीता मे. हॉटेल हेरीटेज यांची नियुक्ती करण्यातआलीआहे. त्याच प्रमाणे चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मे. हॉटेल हेरीटेज हे स्वतः करतील. संबंधीत सेंटरवरील जबाबदारअधिकारी/कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्र. खाली नमुद केलेले आहे. कृपया त्याची नोंद घ्यावी व सेंटर्सवरील सोई व सुविधाबाबत काही अडचणी असल्यास संबंधीत अधिका-यांशी तसेच संबधीत झोनचे सहा.आयुक्त यांचेशी संपर्क साधावा.
अ.क्र. | विलगीकरण सेंटरचे नाव | अधिका-यांचेनाव | भ्रमणध्वनी क्र. | वितरण करणारी एजेन्सी |
1 | पाचपावली पोलिस क्वॉर्टर, पांचपावली, नागपूर | श्री. प्रशांत पुस्तोडे | 9404155138 | मे. हॉटेल हेरीटेज, नागपूर
1) श्री. रंधीर खंडुजा, मालक (भ्र.क्र.7276222222) 2) श्री. गीरीराज, मॅनेजर (भ्र.क्र.8007735355) |
2 | एम.एल.ए. होस्टेल, सिव्हील लाईन्स, नागपूर | श्री. वि. जी. नाईक | 9421806073 | |
3 | रविभवन, सिव्हील लाईन्स, नागपूर | श्री. सुर्यकांत पाटील | 8698000201 | |
4 | वनामती कॅम्पस, व्हि.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर | श्रीमती कडु | 7030012330 | |
5 | सिम्बॉइसिस स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी होस्टेल, वाठोडा, नागपूर | श्री. उज्वल धनविजय | 9145442973 | |
6 | युनिव्हर्सिटी बॉईज होस्टेल, लॉका कॉलेज चौक, नागपूर | श्री. श्रीकांत देशपांडे | 9923385633 | |
7 | व्हि.एन.आय.टी | श्री. सुहास अल्लेवार | 9423419346 | |
8 | आर.पी.टी.एस. | श्री. डि.डि.मेंडुलकर | 9923389244 |