फोटो: स्मार्टसिटी नागपूर पाण्यात.. रस्त्यावर गुढघाभर पेक्षा जास्त पाणी

शहरासह परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे अनेक रस्ते गेले पाण्याखाली गेले आहेत. या पावसाचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. विधान भवन परिसात पाणी तुंबले आहे. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्‍यात आले आहे. विधानपरिषदेचे कामकाज स्थगितीची घोषणा ते सभागृह सुरू झाल्यावर म्हणजे बारा वाजता होईल.

निम्म्या शहरात गुढघाभर पाणी..

निम्म्या शहरात गुढघाभर पाणी साचले आहे. सोनेगाव, कन्नमवार नगरमध्ये बहुतांश घरात पाणी शिरले आहे. एवढेच नाही तर मंतत्र्यांच्या बंगल्याबाहेर पाणी साचले आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागपूरमध्ये मुंबईसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या तळघराची पाहणी केली. दुसरीकडे हवामान विभागाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच इंटरनेट ही बंद आहे.

हवामान खात्यातर्फे विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तरीसुद्धा प्रशासनाने काहीही केले नसल्याचे यातून दिसते आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांची उंची जास्त असल्याने पाणी थेट बाजुच्या वस्त्यांमधील घरांमध्ये शिरले. यात काचीपुरा, अंबाझरी, पांढराबोडी, कळमना या परिसरांचा समावेश आहे. तसेच रिंग रोडवरील काही भागात तर रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळासाठी वाहतूक बंदच होती. यात प्रामुख्याने छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाचा समावेश आहे. या मार्गावरील एका बाजुला सध्या सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने चांगलेच पाणी साचले होते. तसेच शंकरनगर चौकातील वाहतुकसुद्धा काही काळासाठी बंद झाली आहे.

पहाटेपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी ६.३० वाजेपर्यंत शहरात ६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आणि दुपार पर्यंत हि नोंद ११३ mm झाली. शनिवारी आणि रविवारीसुद्धा नागपूर तसेच विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक आणि केंद्रीय हवामान खात्यानुसार विदर्भात १० तारखेपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे.
Also Read : Nagpur Surpasses Monthly Average with 113 mm rain

आपल्या आजुबाचे फोटोग्राफ आम्हाला whatsapp द्वारे पाठवू शकता – आमचा whatsapp क्रमांक 9765123455