कस्तूरचंद पार्क वर दसरा उत्सव करीता रावण, कुम्भकर्ण आणि मेघनाथ यांचे पुतळे सज्ज

Date:

नागपुर :- कस्तूरचंद पार्क वर उद्या होणाऱ्या रावण दहन करता रावण, मेघनाथ आणि कुम्भकर्ण यांचे पुतळे उभारण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजित करण्यात आला आहे. नागपूर येथे गेल्या ६६ वर्षांपासून सनातन धर्म युवक सभा कडून या दसरा उत्सव चे आयोजन केले जाते. रावण दहन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय मंत्री नितीन गड़करी यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. माहीत असावे की रावण दहन बघण्यासाठी केवळ नागपूरच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक देखील शहरात या उत्सवाला येतात. रावण दहन करण्यापूर्वी, रामायण थीमवर आधारित नाटक सादर केले जातात, त्यानंतर कुंभकर्ण, मेघनाथ आणि शेवटी रावण दहन केले जाईल.

अधिक वाचा : नागपूर महालेखाकार कार्यालयाद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांसाठी 17 व 18 ऑक्टोबर ला दीक्षाभूमी नागपूर येथे मार्गदर्शन केंद्र

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related