नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुट्टीबोरी अंतर्गत येणाऱ्या धवलपेठ गावात हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात १ लाख ४२ हजार किमतीची जवळपास ६ हजार लिटरहून अधिक दारू नष्ट करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०० लिटर क्षमतेचे १६ प्लास्टिक बॅरेल्स, २०० लिटर क्षमतेचे २० लोखंडी ड्रम, २० लिटर क्षमतेचे २ कॅन्स, ७ दांडी पिंप, ३५ लिटर क्षमतेचा १ कॅन, लोखंडी ड्रम्स तसेच ६४०० लिटर सडवा (रसायन) आणि ६० लिटर मोह दारू जप्त करून नष्ट केली.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात विभागातील निरीक्षक संजय मिठारी यांनी ही कारवाई केली. यावेळी जिल्ह्यातील चिखली देवस्थान परिसरात अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्या ब्रम्हानंद पुरणलाल बिजलेकर आणि संदीप जोडापे यांच्यावर सुद्धा दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा : नागपुरात तीन लाखांची ई-तिकिटे जप्त