नागपूर : नागपूर महानगरपालिकेशी संबंधित दक्षिण नागपुरातील विविध प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले.
दक्षिण नागपुरातील विविध कामांसंबंधी शुक्रवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर कोहळे बोलत होते.
बैठकीमध्ये आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नगरसेवक अभय गोटेकर, राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका स्वाती आखतकर, कल्पना कुंभलकर, भारती बुंदे, वंदना भगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये राजाबाक्षा हनुमान मंदिर सौंदर्यीकरण, अयोध्या नगर येथील साई मंदिर सौंदर्यीकरण, बुधवार बाजार येथील विकास कामे, मानेवाडा व दिघोरी दहन घाटाचे सौंदर्यीकरण, दक्षिण नागपुरात मनपा अंतर्गत करण्यात आलेले सीमेंट रस्ते, पूर्व बालाजी नगर पंचकमेटी हनुमान मंदिर येथील साउंड सिस्टीम व तुटलेल्या खेळण्यांबाबत, बांबू उपवन वाचनालय उल्हास नगर, जानकी नगर, चिटणीस नगर येथील कामाचा आढावा, दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी पट्टे वाटपाबाबत सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, नवीन बाभुळखेडा येथे व्यापारी संकुल करणे, सक्करदरा तलाव स्वच्छता या विषयांचा आढावा घेण्यात आला.
अयोध्या नगर येथील साई मंदिराचे सौंदर्यीकरणाच्या कामासाठी शासकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले. राजाबाक्षा हनुमान मंदिर, रमना मारोती हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाबाबत डिसेंबरच्या अखेरपर्यंत त्वरीत निविदा काढण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले. उल्हास नगर, जानकी नगर, चिटणीस नगर येथील बांबू उपवन वाचनालय महिनाभराच्या आत सुरू करा, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मानेवाडा व दिघोरी दहनघाट सौंदर्यीकरणाबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
सावित्रीबाई फुले झोपडपट्टी पट्टे वाटपासंदर्भात आवश्यक मार्गदर्शनाचे पत्र तात्काळ शासनाकडे पाठवून नागपूर महानगरपालिकेने पट्टे वाटपासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी निर्देशित केले. झोपडपट्टी पट्टे वाटपामध्ये उशीर करण्यात येत असल्यावर आमदार सुधाकर कोहळे यांनी नाराजी वर्तविली. याशिवाय दक्षिण नागपुरातील एलईडी, सिमेंट रस्ते, मानेवाडा मुख्य मार्गावरील गडर लाईनच्या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी दिले.
अधिक वाचा : इंधन बचत मोहिमेचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ