नागपूर : स्टार बसने शाळा काँलेज मध्ये अवागमन करणाऱ्या मुलीसोबत मैत्री करून बसच्या वाहकांनीच लैंगिक अत्याचार केला असल्याची खळबळजनक घटना मानकापूर येथे घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी नागपूर शहर बसच्या चार वाहकांना अटक आहे.
उमेश मेश्राम (वय २२ वर्ष), धर्मपाल शेंडे (वय २२ वर्ष), आशिष लोखंडे (वय २५ वर्ष) व शैलेश वंजारी (वय ३१ वर्ष) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते सर्व मनपाची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या स्टार बस मध्ये कंडक्टर आहे.
यशोधरा नगर भागात राहणारी 16 वर्षिय पीडित तरुणी 11 वी ची विद्यार्थीनी आहे. ती शाळेत दररोज स्टार बसने जाणे येणे करीत होती. या दररोजच्या प्रवासा दरम्यान एका आरोपी कंडक्टरने तिच्या सोबत ओळखी वाढवून मैत्री केली. तिला जाळ्यात ओढल्यानंतर त्याने तिला एक दिवस मित्राच्या फ्लॅटवर बोलावून अतिप्रसंग केला. त्याच्या भितीने ती गप्प राहिली.
तिच्या गप्पपणाचा गैरफायदा घेत त्याचा विक्रुतपणा नेहमीचाच झाला होता. तो एवढ्यावर थांबला नाही तर तिला ब्लॅकमेल करीत त्याचे मित्र असलेल्या वरील आरोपी सोबतही शय्यासोबत करण्यास भाग पाडले. तिच्या असह्यतेचा गैरफायदा घेत तिला कधीही त्रास देत होते . त्यांंचे हे क्रुत्य ५ते ६ महिन्यापासून सुरु होते. आरोपींनी तिला जानेवारी मध्ये अँलक्सी हास्पिटल जवळील एका आरोपीच्या फ्लॅटवर बोलावले व छळले. त्यांच्या या नेहमीच्या त्रासाने वैतागून तिने ओरोपींची यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. घटनास्थळ मानकापूर हद्दीत असल्याने मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींंना अटक केली आहे.
अधिक वाचा : अपहरण करून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार