‘‘राष्ट्रीय आयुर्वेद क्रिडा महोत्सव’’ मध्ये श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सुयश

Date:

राष्ट्रीय स्तरावर ‘नस्य’ द्वारा दि. 27/9/2018 ते 29/9/2018 या कालावधीमध्ये भोपाळ (म.प्र.) येथे ‘राष्ट्रीय आयुर्वेद क्रिडा महोत्सव’ च्या अंतर्गत विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.

श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी बैंडमिंटन, धाव स्पर्धा व बुध्दिबळ इत्यादि स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी साक्षी खापरे व चैताली लेकुरवाळे यांनी बॅडमिंटन (डबल) मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले तर कल्याणी बोंदरे हिने 400 मीटर (मुली) धाव स्पर्धे मध्ये दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक प्राप्त केले.सल्लागार म्हणून वैद्य विनोद रामटेके यांनी चमूचे मार्गदर्शन केले.

संपुर्ण भारतातून दीडशे महाविद्यालयामधून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी क्रिकेट, कॅरम, बुध्दिबळ, धावस्पर्धा, व्हॉलीबॉल इ. क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव वैद्य गोविंद प्रसाद उपाध्याय, प्राचार्य वैद्य मोहन येवले, उपप्राचार्य डॉ. मृत्युंजय शर्मा, डॉ. रमण बेलगे, डॉ. जय छांगाणी तसेच इतर समिती सदस्य व शिक्षकवृंदांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा : ‘Let’s Talk’ – An Awareness Session on Gynaecological issues organized by DAIMSR

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related