नागपूर: यंदा प्रथमच संत्रानगरी नागपूरांत हॉटेल ले मेरिडियन मध्ये 28 ते 30 सप्टेंबर 2018 ला, येथे ‘स्पाईन 2018’ ही न्युरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडियाची 18 वी वार्षिक परिषदचे आयोजित करण्यांत येणार आहे. आधुनिक उपचारातील तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत नागपूरचेही नाव झळकेल. सम्मेलनास 25 पेक्षा अधिक अांतरराष्ट्रीय विशेषज्ञ व 30 राष्ट्रीय तज्ज्ञ तसेच 300 प्रतिनीधी उपस्थित असणार असून ते आपआपसातील भेटीतून संवाद व विचार मंथन करून मणक्यांच्या आजारात ‘स्पायनल सर्जरी’ भूमिकेवर सखोल चर्चा करणार आहेत. परिषदेचे घोषवाक्य ‘‘ आजच्या कमीतकमी छेद देत कण्यावरील होणाया शस्त्रक्रियांच्या युगात हालचाल न बिघडवता मणक्यावर शल्योपचार‘‘ हे ठरविण्यात आले आहे. (Motion Sparing Spinal Surgery in the Era of Minimal Invasive Spine Surgery).
प्रथमच आपल्या देशांतजागतिक मज्जारोग महासंघाचे सदस्य एकत्रित येवून सर्वानूमते ‘सर्व्हायकल मायलोपॅथी या मानेच्या मज्जारज्जूच्या व्याधी वरील उपायावर एकमुखी निर्णय करणार असून तो ‘‘नागपूर मार्गदर्शक संहिता’’ म्हणून या पूढे जगभर ओळखल्या जाईल.