तेलगू चित्रपटसृष्टीतील स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)‘पुष्पा : द राईज’ने केवळ दक्षिण भारतच नव्हे, तर संपूर्ण भारतासह जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनची फॅन फॉलोविंग आणखी वाढली आहे. याचे एक उदाहरण म्हणजे अल्लू अर्जुनने ट्विटरवर फॉलोअर्सच्या बाबतीत सुपरस्टार रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे आणि आता सर्वाधिक फॉलोअर्स असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन बनला आहे.
Allu Arjun ट्विटरवर 6.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (एक मिलियन म्हणजे 10 लाख) रजनीकांत यांना 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तथापि, अल्लू अर्जुन मात्र ट्विटरवर कुणालाही फॉलो करत नाही. रजनीकांत हे मुलगी ऐश्वर्या, धनुष, अमिताभ बच्चन यांच्यासह 24 जणांना फॉलो करतात. मेगास्टार चिरंजीवीला 1.2 फॉलोअर्स आहेत. दरम्यान, अल्लूच्या ‘पुष्पा 2’चे शूटिंग मार्चपासून सुरू होणार असल्याचा खुलासा एका मुलाखतीत अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केला होता.