खासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप : सोनूचे नागपूरकरांना ‘फुल्ल पॅकेज’

Date:

नागपूर : सोनू… सोनू… च्या कल्लोळात तो मंचावर उतरला. ब्लू ट्राऊझरमधे अधिकच हॅण्डसम दिसणाऱ्या सोनूने गाणी म्हटली, नृत्य केले, मीमिक्री करत नागपूरकर रसिकांना ‘फुल्ल पॅकेज’ दिले. टाळ्या, शिट्या आणि मस्तीचा हा ‘बोनान्झा’ सुमारे तीस ते चार तास असाच चालत राहिला. सोनू निगमने त्याच्या चाहत्यांना आपल्या प्रत्येक अदाकारीने ‘क्रेझी’ करून सोडले.

प्रसंग होता खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचा. शुक्रवारी मानकापूर क्रीडा संकुलात सोनू निगमला बघण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. सुरुवातीपासूनच लोक ‘सोनू… सोनू…’ असा पुकारा करीत त्याची प्रतीक्षा करीत होते. अर्धा पाऊस तास चाललेल्या समारोपाचा कार्यक्रम संपेपर्यंत कशीबशी त्याच्या चाहत्यांनी तग धरली आणि परत एकदा ‘सोनू… सोनू…’चा नाद स्टेडियमभर निनादला. पडद्यावर सोनूची गाणी सुरू झाली आणि टाळ्या आणि शिट्यांची आतषबाजी झाली. पण सोनू आलाच नाही. सुरुवातीला मान्या नारंग यांनी दोन गाणी सादर केली आणि परत एकदा जल्लोष झाला.

क्रेझी दिल मेरा‘ हे गाणे गातच सोनू मंचावर आला आणि त्याने येताच नागपूरकरांना ‘दिवाना’ करून सोडले. पावसामुळे यशवंत स्टेडियमवरचा कार्यक्रम मानकापूर क्रीडा संकुलात स्थलांतरित करण्यात आला. यावर सोनूने ‘जगह जगह पे लिखा है गानेवाले का नाम’ अशी कोटी केली आणि एकच हशा पिकला. त्यानंतर त्याने ‘दिवाना… मै दिवाना तेरा’ हे गाणे सादर केले. त्याच्या चाहत्यांनी सुरात सूर मिसळत सोनूला कोरस दिला. त्यावर सोनू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून म्हणाला, ‘नितीनजी आप सूर में गाते है ये हमे पता था. लेकिन आपके गाववाले भी बडे सूर में गाते है.’ त्यानंतर टॉयलेट चित्रपटातील ‘हस मत पगली प्यार हो जायेगा’ हे त्याचे आवडते गीत सादर करीत ‘टॉयलेट’मधून पहिल्यांदा काहीतरी चांगले निघाले, अशी कोटी केली तेव्हा परत अख्खे स्टेडियम हास्यरंगात बुडाले.

‘तुम को देखे बिना चैन’, ‘चलते चलते मेरे गीत याद रखना’, ‘अब मुझे रात दिन’, ‘सूरज हुआ मध्धम’ अशी अनेक रोमॅण्टीक गीते एकामागोमाग एक त्याने सादर केली. ‘मेरे सपनों की रानी’ गाण्याचेही त्याने ट्रेनचा आवाजही काढला. एका गाण्यातून दुसऱ्यात लीलया फिरणारा त्याचा स्वर, त्यावर थिरकणारे त्याचे पाय, चाहत्यांशी संवाद साधण्याची शैली पाहून चाहते थक्क झालेत.

खास प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोनूने ‘रंग दे बसंती चोला’ हे गाणे जोशपूर्ण आवाजात सादर केले. ‘भारतमाता की जय’ चा नारा त्याने देताचा परत एकदा स्टेडियममध्ये जयजयकार झाला. चाहत्यांकडून फर्माईश यायला लागल्या, तेव्हा त्याने ‘तुमच्या सर्व फर्माईश पूर्ण होतील, सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल,’ असे म्हटले त्यालाही नागपूरकरांनी होकार दिला.

सेल्फी पॉइंट

सोनू निगमसोबत सेल्फी काढायला मिळावा म्हणून लोकांची चांगलीच धडपड सुरू होते. तो मंचाच्या डाव्या बाजूला गेला की, तिकडील लोक सेल्फी मोडमध्ये जात होते. उजवीकडे आला की इकडच्या लोकांचे कॅमेरे सरसावत होते. सोनूही सेल्फी काढण्यासाठी पूर्णवेळ छान अशी पोज देत राहिला.

अधिक वाचा : पाच दिवसीय बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

जैन क्लब नागपुर की सर्वसाधारण सभा संपन्न

जैन क्लब, नागपुर की वार्षिक सर्वसाधारण सभा हाल ही...

Muzigal Launches Its Music Academy in Dharampeth, Nagpur

Muzigal launches its 1st Academy more academies will...

Fadnavis Bets Big on ‘Ladki Bahin Yojana’ as Maharashtra Prepares for Crucial Polls

As the political stage in Maharashtra heats up ahead...